पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

🛑 पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे 🛑

🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲 ▪️  

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. ▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी – मुंबई * उपराजधानी  – नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या – ३६. ▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे. ▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे

. ▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. ▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते. ▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे. ▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. ▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. ▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे ▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. ▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. ▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा. ▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा. ▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर. ▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे. ▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते. ▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. ▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर. ▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. ▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो. ▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात. ▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. ▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. ▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. ▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. ▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. ▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात. ▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात. ▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. ▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. ▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो. ▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. ▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे. ▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे. ▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. ▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे. ▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. ▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. ▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. ▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. ▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक. ▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. ▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. ▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला. ▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात ▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात. ▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे. ▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. ▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. ▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. ▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. ▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. ▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. ▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. ▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. ▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. ▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

56 / 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *