Chalu Ghadamodi 17 April 2020 Pdf Download
Chalu Ghadamodi 17 April 2020 Pdf Download
द्वितीय ‘जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक’ संपन्न
15 एप्रिल 2020 रोजी सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली झालेल्या द्वितीय जी-20 वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या बैठकीच्या आभासी सत्रामध्ये केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहभाग घेतला होता. बैठकीत कोविड-19 महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक दृष्टिकोनाबाबत चर्चा केली गेली. त्यातले काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
सदस्यांनी जी-20 नेत्यांच्या निर्देशानुसार जीवनाचे रक्षण करण्यासाठी, लोकांचे रोजगार आणि उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी, आत्मविश्वास पुन्हा आणण्यासाठी, आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी, विकासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, मदतीची गरज असलेल्या देशांना मदत देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याविषयक समन्वय, वित्तीय उपाययोजना आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे कमी करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
‘एक्सट्राऑर्डिनरी लीडर्स’ शिखर परिषदेदरम्यान जी-20 नेत्यांनी घोषित निष्कर्षांवर विशेषत: कोविड-19 ला प्रतिसाद देताना जी-20 कृती आराखडा तयार करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे समर्थन केले.
अर्थमंत्र्यांनी शाश्वत मार्गाने आर्थिक स्थैर्य राखताना लोकांचे जीवन आणि उपजीविका यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री आणि गव्हर्नरांच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांना भारत सरकारकडून असुरक्षित क्षेत्रांना जलद, वेळेवर आणि लक्ष्यित मदत देण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.
माहिती जी-20 समूह
आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ‘ग्रुप ऑफ ट्वेंटी’ (किंवा जी-20) हा प्रमुख मंच आहे. वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांचा नवा ग्रुप ऑफ ट्वेंटी (जी-20) फोरम 25 सप्टेंबर 1999 रोजी औपचारिकपणे तयार केला गेला. या समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ (EU), फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन (UK) आणि संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशांचा समावेश आहे. हा समूह एकत्रितपणे जागतिक GDPच्या 90%, जागतिक व्यापाराच्या 80% आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करतो.
🎇 कोविड-19 रुग्णांपासून नमुना गोळा करण्यासाठी DRDO ने एक ‘कक्ष’ विकसित केले 🎇
संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या अंतर्गत येणारी हैदराबादची संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (DRDL) येथे ‘कोविड-19 रुग्णांपासून नमुने गोळा करण्यासाठी “कोविड सॅम्पल कलेक्शन कियोस्क (COVSACK)” विकसित करण्यात आले आहे.
💢 ठळक बाबी 💢
हैदराबादच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे कक्ष विकसित करण्यात आले आहे.
या कक्षात सुरक्षितता राखून कोरोना संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी संकलित केले जाऊ शकतात. यामुळे संरक्षण परिधानाची गरज भासत नाही.
हे कक्ष स्वच्छ करण्यासाठी मानवी मदतीची गरज नाही, ते आपोआप निर्जंतुक केले जाऊ शकते. रुग्ण या कक्षातून बाहेर पडल्यावर, चार नोझल्समधून निर्जंतुक द्रव्याचा फवारा 70 सेकंदांसाठी कक्षात केला जातो. त्यानंतर पाणी आणि अतिनील किरणांद्वारे त्याला अधिक निर्जंतुक केले जाते. त्यानंतर ही व्यवस्था पुढच्या रुग्णाचे नमुने घेण्यासाठी तयार होते. या प्रक्रियेसाठी केवळ दोन मिनिटे वेळ लागतो.
या कक्षासाठी साधारण एक लाख खर्च रुपये येतो. सध्या DRDO ने असे दोन कक्ष तयार केले असून ते हैदराबाद च्या ESIC रुग्णालयाला दिले आहेत.
ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे. या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे. या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार. कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी उत्तराखंडमध्ये या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची योजना आहे. राज्यात कोविड-19 रूग्णांचा शोध घेण्यासाठी देखील राज्यातली यंत्रणा ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’चा वापर करणार आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्यास प्रणाली तसा इशारा देखील देणार.
Chalu Ghadamodi 17 April 2020 Pdf Download, चालू घडामोडी 17 एप्रिल 2020 डाउनलोड करा, Chalu Ghadamodi 17 April 2020 in Marathi.
Lateest Job Updates Visit Now
Mpsc Online Test Series Join Now
इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा
- MIDC Exam Information Pdf Download
- मेगाभरती परीक्षा माहिती
- मेगाभरती प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
- कृषिसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
- मेगाभरती ऑनलाइन टेस्ट सोडवा
- वनविभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती
- मेगाभरती पुस्तक यादी डाउनलोड करा Megabharti Exam Book List
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
विश्वातील मोठे महत्त्वाचे माहिती, जगातील मोठे,रस्ते,खंड, देश, Gretest Things in the World , जगातील मोठ्या वस्तु माहिती