Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान

Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान UK Coronavirus new strain ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान सुरू आहे. नव्या करोनाचा संसर्ग वेग अधिक असल्याचा म्हटले जात असताना एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ३६ हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान

Carona News ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान

लंडन: ब्रिटनमध्ये वेगाने प्रसार होणाऱ्या नवीन स्वरूपातील करोना विषाणू आढळल्याने चिंता वाढल्या असतानाच, बुधवारी, एका दिवसात ३६ हजार ८०४ करोना रुग्णांची नोंद झाली. करोना महामारी सुरू झाल्यापासूनच्या काळातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनचे मंत्री रॉबर्ट जेनरिक यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले की, दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक झालेल्या वाढीस करोनाच्या जनुकीय बदल झालेला नवीन विषाणूच कारणीभूत आहे. मात्र हा विषाणू सध्या प्रामुख्याने लंडन तसेच देशाच्या आग्नेय भागातच आढळून येत आहे. या भागात याआधीच चौथ्या श्रेणीचे निर्बंध लागू असून सक्तीने घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर विविध देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. याशिवाय फ्रान्सने ब्रिटनमधून येणाऱ्या ट्रकवर बंदी घातल्याने हजारो मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत. भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आतापर्यंत युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

आणखी एक नवा विषाणू आढळल्याने खळबळ

करोना व्हारसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक करोना व्हायरस ( new more coronavirus strain ) आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून ( south africa ) आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये करोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी बुधवारी दिली. यानंतर गेल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या सर्व नागरिकांना स्वत: ला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत.

    74 / 100

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *