Home / Arogya sevak Exam Information / आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी

आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी

आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी महाराष्ट्र आरोग्य विभागात येणार्‍या दिवसात होणार निवड थेट गुणांनुसार न करता परीक्षेनुसार करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात आहे.

आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी

उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोविड 19 विषाणू ची परिस्थिति त्यावेळी घेणे योग्य होते. परंतु आता सर्व Unlock झाले आहे व बसेस सुद्धा चालू झाल्या आहेत. तसेच UPSC/ MPSC यांच्या सुद्धा परीक्षा होत आहेत. अश्या परिस्थितित परीक्षा न घेता निवड करणे म्हणजे गेली 10 वर्षे पासून काही उमेदवार अभ्यास करत आहेत. ते त्यांचे करियर टांगणीला लावून परीक्षेची तयारी करत असून असे करणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. व यामुळे त्याच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. कारण काहीही काम न करता फक्त गेली किमान 5 वर्षे या आशेवर बसून ते अभ्यास करत असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही मार्ग आता उरलेला दिसत नाही.

तरी त्यांची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने विचार करून फेर निर्णय घ्यावा. अन्यथा उमेदवार आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

💥💥💥शासनाचा गट-ब अराजपत्रित व गट क पदांची भरतीबाबत नवीन शासननिर्णय सरकारचा सरळसेवा भरती नवीन आदेश पशू विभाग आरोग्य विभाग, पोलिस भरती, कृषिसेवक, अंगणवाडी सेविका,नगरपरिषद डाउनलोड करा लिंक

👇👇👇👇

डाउनलोड करा लिंक

74 / 100

One thought on “आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी

  1. @कृपया ही कमेंट पुर्ण वाचून प्रतिक्रिया द्यावी @
    तुम्ही म्हणताय कि, बाकीच्या परीक्षा होणार आहेत मग आरोग्य विभागाची का होत नाहीये? सर बाकीच्या परीक्षांची पूर्वतयारी अगोदरच झालेली आहे. परीक्षा घेणारी कमेटी व व्यवस्था ठरलेली आहे. पण आरोग्य विभागाच तस नाहीये. कारण महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्यानंतर परीक्षा कोण घेणार हे ठरलेलं नाही, कंपनी निवड झालेली नाही. ही सर्व प्रोसेस खूप वेळ लागतो. ते सध्यातरी शक्य नाही.
    मी आरोग्य विभागाच्या मेरीटवर होणाऱ्या भरतीला विरोध करणाऱ्या सर्वांना आग्रहपूर्वक सांगू इच्छितो कि, तुम्ही म्हणताय कि आम्ही 4-5 वर्ष भरतीची तयारी करतोय! त्यामुळे भरती मेरीटवर न होता परीक्षा घेऊन झाली पाहिजे. जर भरती मेरीटवर झाली तर आमच्यावर अन्याय होईल ! अरे बाबांनो मेहनत काय तुम्हीच करताय काय? शालेत दहावी, बारावी, पदवीला मेहनत करून अभ्यास करायचं नाही त्यामुळे कुठे नोकरी मिळत नाही म्हणून स्पर्धा परीक्षेची 4-5 वर्ष तयारी करत राहायचं असं तुमच्या पैकी बऱ्याच जणांचं असत. अरे आम्हाला जे दहावी, बारावी किंवा पदवीला जे चांगले गुण आहेत ते आम्ही मेहनत करून मिळवलेले आहेत आणि आम्हीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून कष्ट करून या भरतीची तयारी करत आहोत. तूम्हाला आणखी एक सांगू इच्छितो कि जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा मेरीटवर भरती होईल हे कुणालाच माहित नव्हतं. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच फॉर्म भरले आहेत. त्यामुळे बोगस गुण असलेल्यानी फॉर्म भरायचा प्रश्नच येत नाही.त्यामुळे जर मेरीटवर भरती झाली तरी मेहनत करून दहावी, बारावी किंवा पदवीला चांगले गुण मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाहीये. कृपया विरोध करणं सोडा.
    मला सांगा या भरतीचा फायदा कोणाला झाला पाहिजे?
    मी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात आणू इच्छितो कि, मेरीटवर भरती काय उगाचंच होत नाही आहे. त्याला काही कारण आहे. सध्या कोरोनाच संकट संपूर्ण जगावर आहे व या परीक्षेसाठी खूप विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जर परीक्षा घ्यायची झाली तर या सर्व भरतीची तयारी करण्यासाठी 3-4महिने जातील व निकाल लागायला 2 महिने असा 5-6 महिन्यांचा कालावधी लागेल. अर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे खुप गर्दी होईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्यातरी परीक्षा घेणं योग्य राहणार नाही. तसेच आरोग्य विभागात मनुष्यबळाची तातडीची गरज आहे. त्यामुळे मेरीटवर भरती करणे उचित राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *